Wednesday, May 4, 2011

कळे कधी न कळे कधी

कळे कधी न कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी
राग रोष लोभ कधी
लाज कधी कधी मोह सखी

कळे कधी न कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी
रुजणे कधी रुसणे कधी
बंद ओंठ मनी हसणे सखी

कळे कधी न कळे कधी
चाले मनी तुझ्या काय तरी
माया कधी कधी बिलगणे उरी
अवघड वेळी कशी अनासक्त बरी

कळे कधी न कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी

No comments: