नात्यातला गोडवा, मनातला घोर
अबोलाचा रुसवा नि बदबडून बोर
परि कवितांना विनवण्या जोवर पडत नाही फोल
उमजेना तोवर सारा शब्दांचा हा झोल
कळे चाफ्याचा गंध नि अबोलीचे बोल
अन होई बसल्याठीकाणी शून्यात गोल
नकळे अचानक ही कवितांची ओढ
प्रिये तुझीच भूल सारी अथवा शब्दांचा हा झोल


No comments:
Post a Comment