Monday, May 23, 2011

आई .....

का मन उडते जाते थेट तिच्या दारी
अलबत मग आठवते दही कवड्यांची ती ओंजळी
घर सोडताना म्हणाली होती खुळी
"जातो" नाही रे वेड्या पाखरे "येऊ का" म्हणती 

का मन उडते जाते थेट त्या घरी
ती रागावली म्हणून आपली वाटे जिथे पायरी
दूरदेशीच्या पाखराला साद घालते जिथली उंबरी
उंबरठ्यावर डोळे जोडून उभी बघ आई तुझी

का मनी घोटाळती अजुनी त्या ओल्या सरी
श्रावणाचा गारवा अन चिंब मायेची हाक ती
पाउस सारा भिजवितो थेट तसला आजही
अन खोल भिडवतो वास तो जोडून बसलो तिच्याशी

का मन उडताना सोडते जगासाठी तिला
जरी माहिती असते तयाला ...
स्वप्न प्रवासाची अन यशाची तयाच्या
सुरुवात ती अन अंत ती

आई .....

Wednesday, May 4, 2011

ते राहुनी गेले

सुटले कधीच ते गाव मागे 
सुटली कधीच ती गोड घडी 

क्षणात सुटली मिठीही तुझी 
अडकले श्वास ... अडकुनी गेले

सुटले कधीच ते रुसणे फुगणे
सुटली तुझी ती मऊ कुशी
क्षणात सुटले हात तरी
राहिला गंध ... राहुनी गेला

सुटले कधीच ते क्षण कोवळे
सुटली दुराव्याची सोबत तुझी 
क्षणात लाजली अलवार नजर  
सुचले नाही ..... ते राहुनी गेले

विसरू कशी ती सांझ राणी

विसरू कशी ती सांझराणी
जी मिठीत माझ्या विरघळली
विकल्प करुनी मरणे-जगणे
हृदयाची वस्त्र सारी भिजवली

विसरू कशी ती सांझ राणी
जिने रूप तुझे ते ग्रहणले
नकळत तिच्या धुक्यातूनही
चकव्याला चांदणे गवसले

विसरू कशी ती सांझ सई
कल्लोळातही जी तुझ्यात हरवली
नको नको म्हणुनी तरी
ओठातली ओली माया ओठी माझ्या लावून गेली
मखमाली तुझ्या ओठात सखे
थंडीत शहारुनी मोगरा जसे
अन साजणाच्या मिठीत तुटून जसे
दडवून मन कैक तुफान बसे

मखमाली तुझ्या ओठात सखे
रंग पेरले फुलपाखरांनी जसे
अन काजवे डोळ्यातून लुकछुप जसे
वेड साजणाला लावीत बसे

कळे कधी न कळे कधी

कळे कधी कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी
राग रोष लोभ कधी
लाज कधी कधी मोह सखी

कळे कधी कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी
रुजणे कधी रुसणे कधी
बंद ओंठ मी हसणे सखी

कळे कधी कळे कधी
चाले मी तुझ्या काय तरी
माया कधी कधी बिलगणे उरी
अवघड वेळी कशी अासक्त बरी

कळे कधी कळे कधी
सोंग सारे मज तुझे सखी

मावळेल सूर्य उद्या माझ्यापरी

रुसतेस जेंव्हा तू माझ्यावरी
अगतिक होऊन थांबतो क्षणभरी
होतो खुद्द स्वाताहाचा वैरी
दुनिया वाटते ओसाड सारी

चिडीचुप जाहली पाखरे सारी
थबकुनीगेला वार खिडकिवरी
मेघहीअश्रु धाळून गेली
पण गंध विसरली माती कोठेतरी

प्राणहीन जाहली आता निसर्गराणी
ब्रह्मांड मजला करितो त्राही
आवर सखे हा रोष वेळेवारी
अथवा मावळेल सूर्य उद्या माझ्यापरी

आशिकी

इल्तेजा-ए-मोहब्बत है परवाने की
शमा के इश्क में जल जाने की
कातिलनुमा पलकों में जनाब की
डूब के दिखा दें ...... आशिकी

हिवाळा

तूच फुलांतील धुंद मोगरा
तूच मोहाचा कौल लाजरा
तुझाच आहे निसर्ग सारा
निसर्ग केवळ तुझा इशारा

खिडकीशी आज राघू आला
तक्रार तुझी करुनी गेला
स्वच्छंद पायांचा खेळ आवरा
पंखांचा पाखरांनाही भार झाला

तुझ्या मनाशी गूज साधण्या
बरसुनी श्रावण कधीच गेला
कसा कवितेचा करू दुरावा
आला प्रीतिचा गुलाबी हिवाळा

पढो ना पढो तुम

पढो ना पढो तुम
लिखो ना लिखो तुम

सुनो ना सुनो तुम
कहो ना कहो तुम

चाहेंगे तुम्हें हम
चाहोगे हमें तुम

चाहे जहाँ रहो तुम
चाहे जहाँ रहे हम

चाहे रहो खफा तुम
चाहे  रहो यूँ गुमसुम

चाहेंगे तुम्हें हम
चाहोगे हमें तुम

चाहे ना माफ़ करो तुम
चाहे जो दिल सजा दो

बस ना कहना
वास्ता ना रखोगे हमसे तुम

जान भी दे दें खुशीसे
पर चाहत तेरी ना होगी कम

तू ग्रीष्मातला गुलमोहर

तू ग्रीष्मातला गुलमोहर
हिवाळ्यात चंदेरी पारिजात
श्रावणात छत्र वडाचे
अन गर्द मेंदीची पात

गोडवा तुझा जणू मध
सौंदर्य जणू सागराची लाट
तळपती जशी वाळवंटाची झळ
परि शीतल कोर चांदण्यात

तुज्ही अवखळ लाजरी मोहिनी
पण गूढ खोलवर आत
घातक मृगजळ लोचनी
अन बुडून तरायची वाट
अन बुडून तरायची वाट।

दूर असली लाख तरीही

दूर असली लाख तरीही काळजाच्या तू पास आहे
तुझ्यावीण येते रोज गाडी तरीही लोचनी अजुनी आस आहे
रमविण्या सारे विश्व बैसिले तरी तुझ्यावीण राणी माझा मीच उदास आहे

सभोवताली तारीकांची रास रंगली परी मोहिनी तुझीच माझ्या चंद्रास आहे
व्यापात माझ्या तुजला वेळ नाही हा तुझ्या कल्पनेचा विलास आहे
समय काढू कधी राणी हर श्वासात तुझाच सुवास आहे

वाटते जर तुला क्षमा नाही मज पामराला घे कतार नि भेद हे काळीज, सज्ज तुझा हा दास आहे

सारा शब्दांचा हा झोल

नात्यातला गोडवा, मनातला घोर
अबोलाचा रुसवा नि बदबडून बोर 
परि कवितांना विनवण्या जोवर पडत नाही फोल 
उमजेना तोवर सारा शब्दांचा हा झोल 

कळे चाफ्याचा गंध नि अबोलीचे बोल 
अन होई बसल्याठीकाणी शून्यात गोल 
नकळे अचानक ही कवितांची ओढ 
प्रिये तुझीच भूल सारी अथवा शब्दांचा हा झोल