Monday, March 31, 2014

सावळ्याची तू

सावळ्या अंगावरी या उजळ ती कांती तुझी 
सावळ्या मनावरी या मधाळ ती लज्जा तुझी 
सावळ्या अन या निशेची चंद्राळ ती लव तुझी 
सावळ्या त्या तळ्यातली ओशाळशी थरथर तुझी 

सावळ्या कोण्या धुनेला उजळी ती खळ तुझी
सावळ्या अन शुभकराची मायाळ ती हाक तुझी
सावळ्या एक मृगजळाला स्वप्नाळ ती आस तुझी 
सावळ्या या हृदयातली निखळशी धगधग तुझी 

No comments: