Thursday, March 20, 2014

जरासे तू मी

जराशी तू अन जरासा मी ,
माझीशी तू अन तुझासा मी ।
समजशी तू कि कसासा मी ; 
ओळखशी तू बस तसासा मी ।।

उघडशी तू तो कवडसा मी ,
पाहशी तू त्या स्वप्नासा मी ।
तुझीशी तू नाही माझासा मी ;
माझीशी तू अन तुझासा मी ।।

No comments: