Sunday, September 23, 2012

रुपानं साजिऱ्या तुझ्या

रुपानं साजिऱ्या तुझ्या दिवस हा उजळून दे ,
हसण्यानं गोजिऱ्या तुझ्या वात हा वाहून दे //

दे दिशा ही पाखरांना मनाची एक तरंग दे ,
मुक्यानं लाजऱ्या तुझ्या फूल ही रंगून दे //

दे मला ग चंद्रिके मायेची साद ती जुनी ,
अन ये बरे मिठीत तू गालामधे लालावूनी ...
अन ये बरे मिठीत तू गालामधे लालावूनी //